शिंदे गटाचा ठाकरे गटाला दणका, वाचा काय घडलं?

मुंबई : नुकतेच संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये महिला आरक्षण विधेयक मंजूर झाले. यातच आता शिंदे गटाकडून महिला आरक्षणाच्या वेळी अनुपस्थित राहिलेल्या ठाकरे गटाच्या चार खासदारांना नोटीस देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
लोकसभेत नारी शक्ती वंदन विधेयक मांडण्यात आले. हे विधेयक प्रचंड बहुमताने मंजूरही करण्यात आले. मात्र, यावेळी ठाकरे गटाचे चार खासदार अनुपस्थित होते. यासंदर्भात खासदारांनी अद्याप कोणतीही माहिती लोकसभा सचिवालयाला दिली नाही.
त्यामुळे व्हिप नाकारल्याचे सांगत ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत, राजन विचारे, संजय उर्फ बंडू जाधव, ओमराजे निंबाळकर या चार जणांना शिंदे गटाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. तसेच यावर लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.
शिंदे गटाच्या प्रतोद भावना गवळी यांच्याकडून ही नोटीस देण्यात आली आहे. ठाकरे गटाच्या खासदारांवर विशेष अधिवेनाच्या वेळी व्हीप नाकारल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यातूनच त्यांना ही नोटीस देण्यात आली आहे.