शिक्षणासाठी आजीकडे राहत होती विद्यार्थीनी, पण ग्रंथालय परिचरने… जळगावात काय घडलं

जळगाव : शहरातील एका महाविद्यालयात ग्रंथालय परिचराने २० वर्षीय  विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे.  विद्यार्थीनीच्या तक्रारीनुसार रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

पोलीस सूत्रानुसार, जळगावात शिक्षणासाठी आलेली २० वर्षीय तरुणी आजीकडे वास्तव्यास आहे. दरम्यान, २६ ऑक्टोबर रोजी लेखी परीक्षा झाल्यानंतर  विद्यार्थीनी  महाविद्यालयाच्या ग्रंथालयात पुस्तक जमा करण्यासाठी गेली. दरम्यान, ग्रंथालय परिचराने दुसऱ्या दिवशी परीक्षा असलेल्या विषयाचे पुस्तक घेऊन जाण्याविषयी आग्रह केला. त्यास विद्यार्थीनीने नकार दिला तरी तो वारंवार पुस्तक नेण्याविषयी तिला सांगत होता. तेथे ही  विद्यार्थीनीसही करीत असताना तिला स्पर्श केला. चुकीने धक्का लागला असेल म्हणून विद्यार्थिनीने दुर्लक्ष केले.

मात्र, ग्रंथालयातून जात असताना तरुणीचा बोट पकडून दरवाजा मागे ओढून विनयभंग केला. घाबरलेल्या अवस्थेत तरुणीने कशीतरी सुटका करून घेत घर गाठले व आजीला हकीकत सांगितली. नंतर  विद्यार्थीनीने शिक्षिकेलाही याची माहिती दिली.  त्यानुसार मंगळवार ३१ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी रामांनद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून एकाविरुद्ध रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.