शिर्डीला जाण्याआधी ‘ही’ नवीन नियमावली वाचा!

मुंबई : शिर्डीचे साईबाबा हे अनेक भक्तांचे श्रध्दास्थान आहे. शिर्डीत भाविकांची गर्दी कायमच असते. आता साई दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांना आधार कार्ड सोबत ठेवावे लागणार आहे. आधारकार्ड दाखवले तरच शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन मिळणार आहे. साई संस्थानने हा मोठा निर्णय घेतला आहे, त्यामुळे एकच चर्चेला उधाण आलं आहे.
साईबाबांच्या दर्शन आणि आरती पास सुविधांमध्ये साई संस्थान प्रशासनाने बदल केला आहे. साईंच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांची फसवणूक होऊ न देण्याची काळजी साई संस्थान घेणार आहे. यासाठी साईबाबा संस्थानने उपाययोजना सुरु केल्या आहेत. पुर्वीच्या दर्शन आणि आरती पासेसच्या पद्धतीमध्ये बदल करण्यात आला आहे. आता दर्शन पास आणि आरती पास घेण्यासाठी साईभक्तांचा मोबाईल नंबर आणि आधारकार्ड नंबर हा बंधनकारक करण्यात आला आहे.
यात गरज पडल्यास आणखी बदल केला जाणार असल्याचं साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.शिवा शंकर यांनी माध्यमांना सांगितले. तर, साईभक्तांची मंदिर परिसरातील एजंटकडून फसवणूक होऊ नये म्हणून साई संस्थानच्या ऑनलाईन वेबसाईटवर बुकींग करावे असे आवाहन CEO पी.शिवा शंकर यांनी भक्तांना केले आहे.