जळगाव : शिवमहापूराण कथेची सांगता आज सोमवारी करण्यात आली. कथा संपल्यानंतर भाविक भक्त हे आपल्या घरी जाण्यासाठी निघाले आहे. जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी नगर रेल्वेउड्डाण पुल ते आकाशवाणी चौक दरम्यान मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ झाली. यावेळी बसस्थानक ते स्वातंत्र्य चौकात वाहतुकीची मोठी कोंडी झाल्याचे पहायला मिळाले.
जळगाव तालुक्यातील वडनगरी येथील बडे जटाधारी महादेव मंदीर परिसरात प्रदीप मिश्रा यांच्या अमृतवाणीतून श्री शिवमहापुराण कथेचे आयोजन ५ डिसेंबर ते ११ डिसेंबर दरम्यान करण्यात आले हेाते. सोमवारी ११ डिसेंबर रोजी ८ ते ११ वाजेपर्यंत शिवमहापूराण कथेची सांगता करण्यात आली. गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या श्री शिवमहापुराण कथेला पुर्णविराम मिळाल्यानंतर मुक्कामी असलेलेल भाविकांसह इतर दररोज येणारे भाविक हे घरी जाण्यासाठी निघाले आहे.
मिळेल त्या गाडीने भाविक आपल्या गावी निघाले. या अनुषंगाने आज जळगाव शहरातील नवीन बसस्थानक आणि रेल्वे स्टेशन येथून परतीच्या प्रवासाला निघालेत. दुपारी १२ ते ३ वाजेच्या दरम्यान बसस्थानक आवारात प्रवाशांची मोठी गर्दी पहायला मिळाली. शिवाय बसस्थानक आवारासह स्वातंत्र्य चौकात वाहतूकची दोन्ही बाजूने कोंडी झाल्याचे दिसून आले. यावेळी पोलीसांच्या मदतीने नियामानुसार वाहतूक सोडविण्यात येत आहे.