---Advertisement---
आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडत आहे. विधानसभा अध्यक्षांसमोर आमदार अपात्रतेबाबत आज सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टाने याप्रकरणात नाराजी व्यक्त केली होती. आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी सुरु आहे.
शिवसेना व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सर्व ३४ याचिकांची एकत्रित सुनावणी घेण्याची मागणी ठाकरे गटाकडून गेल्यावेळी करण्यात आली होती. राहुल नार्वेकर यांनी ३४ याचिका सहा गटांमध्ये विभागल्या. आता आज, २६ ऑक्टोबरला त्यावर सुनावणी होईल. विधानसभा अध्यक्षांनी ३० ऑक्टोबरपर्यंत वेळापत्रक जाहीर केलं नाही तर थेट सुप्रीम कोर्टच वेळापत्रक ठरवणार आहे.
---Advertisement---