ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधातील शिवसेना पक्ष व चिन्हासंदर्भात केलेल्या याचिकेवरील सुनावणी पुन्हा लांबणीवर गेली आहे. ही सुनावणी पुढे लांबणीवर गेली असून ३ आठवड्यानंतर होणार आहे. ही सुनावणी दिवाळीनंतर होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव व चिन्ह वापरण्याचा अधिकार शिंदे गटाला दिलेला होता. यावर ठाकरे गटाने निवडणुक आयोगाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. ही सुनावणी ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी होणार होती. मात्र, आता पुन्हा एकदा लांबणीवर गेली आहे.