लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनंतर आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजप आणि शिवसेनेला धक्के दिले जात आहेत. जळगाव जिल्ह्यातून श्रीराम पाटील यांनी भाजप सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मागील आठवड्यात प्रवेश केला. त्यानंतर त्यांना रावेर लोकसभा मतदार संघाची उमेदवारी मिळाली.
दोन, तीन दिवसांपूर्वी माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपच्या पद आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. माढामध्ये महायुतीने रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यामुळे ते नाराज होते.
आता पश्चिम महाराष्ट्रातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनाला शरद पवार यांनी धक्का दिला आहे. माजी आमदार नारायण आबा पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार आहे.