पारोळा : शिव एकता मित्र मंडळाची शिवजयंती हिंदू-मुस्लिम बांधवांच्या एकोप्याचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पाटील यांनी केले. शिव कॉलनी परिसरातील शिव एकता मित्र मंडळाच्यातर्फे आयोजित शिवजयंतीच्या मिरवणूक प्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून महाआरती करण्यात आली. यावेळी धनदाई शैक्षणिक संस्थेचे चेअरमन डी. बी. पाटील, माजी नगराध्यक्ष सुरेंद्र बोहरा, माजी उपनगराध्यक्ष दीपक अनुष्ठान, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष दिगंबर पाटील, माजी तालुका समादेशक पतंगराव पाटील, भाजपा ओबीसी तालुकाध्यक्ष बापू महाजन, अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष महंमद पठाण, युवा मोर्चा शहराध्यक्ष भैय्या चौधरी, तालुका अध्यक्ष अनिल पाटील, तुषार पाटील, प्रा. राजेश पाटील, इंजि. गणेश पाटील, शहराध्यक्ष मनीष पाटील, जिल्हा सरचिटणीस जितेंद्र गिरासे, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष डॉ. असिफ कुरेशी, माजी नगरसेवक प्रकाश महाजन, संजय पाटील, शितल अकॅडमीचे संचालक रवींद्र पाटील, छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष विजय पाटील, प्रताप पाटील, शिव एकता मित्र मंडळाचे अध्यक्ष विवेक पाटील, सुनील चौधरी, कैलास पाटील, ,दिनेश लोहार, प्रसाद महाजन, शुभम महाजन, गणेश महाजन, पांडुरंग पाटील, मंगेश कुंभार, रवींद्र महाजन, संकेत पाटील यांच्यासह शिव एकता मित्र मंडळाचे सदस्य व करण पाटील मित्र मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पाटील म्हणाले की, शिव एकता मित्र मंडळाची शिवजयंती ही निर्व्यसनी तरुणांची असते. शिस्तीने सवाद्य मिरवणूक काढत हिंदू मुस्लिम बांधव एकोप्याने शिवाजी महाराजांना अभिवादन करतात. भक्तिमय वातावरणात शिवाजी महाराजांचा गजर करत तरुणाई ही एकमेकांचा आदर करत शिवजयंती शांततेत साजरी करतात. त्यामुळे या मिरवणुकीला महिला वर्गांची उपस्थिती देखील मोठ्या प्रमाणात दिसून येते. शिवाजी महाराजांचे संदेश व त्यांची शिकवण ही या मिरवणुकीची महत्त्वाची बाजू असल्याचे त्यांनी सांगितले.
शेवटी शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास माल्यार्पण व आरती करून सांगता करण्यात आली. यावेळी कायदा व सुव्यवस्था राखण्या कामी पोलीस निरीक्षक सुनील पवार, उपनिरीक्षक गंभीर शिंदे, उपनिरीक्षक राजू जाधव, उपनिरीक्षक अमरसिंह वसावे, गोपनीय विभागाचे महेश पाटील, किशोर भोई व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.