तरुण भारत लाईव्ह । ५ सप्टेंबर २०२३। शुक्र ग्रह हा प्रेम आणि वैभवाचा कारक मानला जातो. शुक्र ग्रहाने चार सप्टेंबर ला कर्क राशीत प्रवेश केला आहे. शुक्र हा ज्योतिकशास्त्रात स्त्री ग्रह मानला जातो तसेच सौन्दर्याचे प्रतीक मानला जातो. शुक्राच्या संक्रमणामुळे काही राशींवर सकारात्मक प्रभाव पडणार आहे. तर कोणत्या आहे त्या राशी हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
मेष रास
या काळात या राशींच्या लोकांच्या काही इच्छा पूर्ण होऊ शकतात. व्यवसायात भरभराट होईल. उत्पनाचे नवे मार्ग सापडतील. नशिबाची साथ मिळेल. प्रवासासाठी ही वेळ शुभ आहे.
कर्क रास
या काळात तुमचे आरोग्य चांगले राहील. कुटुंबासोबत छान वेळ घालवता येईल. मुलांची प्रगती होईल. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. नोकरीत बढती मिळू शकते. अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येतील.
कन्या रास
या काळात खूप दिवसांपासून असलेली इच्छा पूर्ण होऊ शकते. विद्यार्थीवर्गासाठी हा काळ त्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळवून देणारा असेल. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. घरात आनंदाचे वातावरण राहील.