तरुण भारत लाईव्ह । २५ सप्टेंबर २०२३। शुक्र हा भौतिक सुखांचा कारक ग्रह आहे. त्यामुळे वैयक्तिक कुंडलीत शुक्र ग्रह बलवान असेल तर भौतिक सुखांची उणीव भासत नाही.सध्या शुक्र ग्रह वक्री असून कर्क राशीत ७ ऑगस्टपासून आहे. आता २ ऑक्टोबरला शुक्र ग्रह सिंह राशीत प्रवेश करेल. शुक्र ग्रहाची स्वरास असलेल्या तूळ राशीत शुक्र ग्रह प्रवेश करेल आणि २५ डिसेंबरपर्यंत याच राशीत रहाणार आहे. त्यामुळे काही राशींवर याचा सकारात्मक परिणाम होणार आहे. तर कोणत्या आहे त्या राशी हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
कुंभ रास
या काळात कुंभ राशीच्या व्यक्तींना धन आणि वैभव प्राप्त होईल. तुमचा समाजात मानसन्मान वाढेल. उत्पन्नात वाढ होईल. मित्रमंडळीकडूंन उत्तम साथ लाभेल. भौतिक सुखांची अनुभूती घेत असताना आपल्यामुळे कोण दुखावेल असं वागू नका. तसेच वडिलधाऱ्या व्यक्तींचा मान ठेवा.
तूळ रास
या काळात तूळ राशीच्या व्यक्तींना नशिबाची उत्तम साथ मिळेल. तसेच सकारात्मक परिणाम दिसून येईल. मुलांच्या अभ्यासातील प्रगती पाहून आनंदी व्हाल. तसेच आध्यात्माममध्ये आवड निर्माण होईल. जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल.