नंदुरबार : शेअरमध्ये जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून नाबार्डच्या एका कनिष्ठ अभियंत्याची तीन जणांनी ७ लाख ३५ हजार रूपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अभियंत्याच्या फिर्यादीवरून धडगाव पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झालीय.
धळगाव येथील ग्रामीण पाणी पुरवठा विभागात कार्यरत असलेलेले नाबार्डचे कनिष्ठ अभियंता तरबेज शेख रईस पिंजारी यांनी धळगाव पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली. त्यानुसार दि. २४ मे ते १२ जून २०२४ च्या दरम्यान ‘गोल्डमॅन सच’ या कंपनीच्या साईटवरून त्यांना शेअर्समध्ये जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून मोबाईल व संगणकाद्वारे सायबर ठगांनी ७ लाख ३५ हजार रुपयांचा गंडा घातला.
धडगांव पोलीस ठाण्यात फसवणुक करणारे परप्रांतिय आरोपी महेश ठाकूरदिन कुशवाहा रा. १०१ ग्राम पिंरा पो. तहंगा (म.प्र.) , सोनू संतोष नागर रा. पाडरी, सिटी लौंडी (म.प्र.) व नलिन गुप्ता रा. बहादुरशाहा जफर मार्ग, दिल्ली यांचे विरोधात गु. र. नं. १६७/२०२४ नुसार भा.द.वी. कलम ४२० व भारतीय माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६(ड) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढिल तपास पो. नि. आय. एन. पठाण करित आहेत.