सत्तापालटानंतरही बांग्लादेशात हिंसाचार आणि अशांतता पसरलेली आहे. पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन शेख हसीना भारतात पोहोचल्या आहेत. सध्या हिंडन एअर बेस येथील गेस्ट हाऊसमध्ये शेख हसीना यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. इथं कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सूत्रांनुसार, त्या काही दिवस भारतात राहू शकतात. त्यांचे नातेवाईक लंडनला रवाना झाले आहेत.
बांग्लादेशातील अस्थिर परिस्थितीवर भारत सरकारने चिंता व्यक्त केली आहे. तसेच शेजारील देशातील परिस्थितीवरही आम्ही सतत लक्ष ठेवून असल्याचे सांगितले. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी राज्यसभेत सांगितले की, भारताचे बांगलादेशशी अनेक दशकांपासूनचे सखोल संबंध आहेत.
बांगलादेशात जे काही घडले, हा एकसूत्री अजेंडा
जयशंकर म्हणाले की, जूनपासून बांगलादेशातील परिस्थिती बिघडू लागली. हा ट्रेंड आजतागायत सुरू आहे. तेथील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही परिस्थिती बदललेली नाही. बांगलादेशात काहीही झाले तरी शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा, हा एकमुखी अजेंडा होता.