---Advertisement---

शेतकरी, कंत्राटी ग्रामसेवकांसाठी शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

---Advertisement---

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारने आज मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे. कंत्राटी ग्रामसेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कंत्राटी कर्मचार्‍यांना आता १६ हजार रुपये मिळणार आहेत. तर शेतकर्‍यांसाठीही निर्णय घेण्यात आले आहेत. सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना सुधारित दराने तत्काळ मदत करणार देण्यात येमार आहे, यासाठी १५०० कोटींना मान्यता देण्यात आली आहे.

अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्यात केंद्राप्रमाणे सुधारणा करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठीही सरकारने निर्णय घेतला असून आता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्ती वाढविली आहे.

मंत्रिमंडळातील निर्णय

लातूर येथे पशुरोग निदान प्रयोगशाळा स्थापन करणार.
पुणे येथे ४ अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करणार.
अतिरिक्त न्यायालये व जलदगती न्यायालयांना दोन वर्षे मुदतवाढ.
मानसिक आजारमुक्त व्यक्तींकरिता पुनर्वसन गृहे योजना.
स्वातंत्र्य सैनिकांना घरांसाठी जमीन देण्यासाठी कौटुंबिक मासिक उत्पन्न मर्यादा वाढविली.
चिमूर आणि शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करणार.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment