जळगाव । गेल्या काही दिवसापासून जळगाव जिल्ह्यात पाऊस कोसळत आहे. सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी खरिपाचे पिके पाण्याखाली गेले आहे. यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. पिकांना खते, तणताशके देता येत नाही. यामुळे शेतकरी पावसाच्या विश्रांती प्रतीक्षा करत आहे. मात्र अशातच हवामान खात्यानं जळगाव जिल्ह्याला पावसाचा अलर्ट जारी केला आहे.
जळगावसह राज्यातील अनेक जिल्ह्यांना हवामान खात्याने पावसाचा अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याने आज बुधवारी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविली आहे. तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलाय.
तर जळगाव, पुणे, कोल्हापूर, सातारा, जिल्ह्यांना देखील पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. दुसरीकडे मराठवड्यातील संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. विदर्भातील सर्व जिल्ह्यांना देखील आज म्हणजेच बुधवारी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलाय.
दरम्यान, जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसामुळे खरिपाच्या पिकांना खते, तणताशके देता येत नाहीय. यामुळे पिकांची वाढ खुंटली असून, आता सूर्यप्रकाशाची गरज आहे. उघडीप नाही मिळाली, तर वाढलेली पिके पाण्यात जाण्याची भिती शेतकऱ्यांमध्ये आहे.