शेतकऱ्यांच्या चिंतेत भर! पेरणीला होऊ शकतो उशिर? पावसाबाबत स्कायमेटच्या नवीन अंदाज वाचाच

मुंबई । देशात मान्सून पावसावर बहुतांश शेतकरी अवलंबून आहे. जून हा पेरणीपूर्ण कामे आणि पेरणीचा महिना आहे. शेतकरी जोरदार पावसाची प्रतीक्षा करत आहे. मात्र अशातच स्कायमेट या खासगी हवामान संस्थेच्या नव्या अंदाजने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. नेमका काय आहे अंदाज? देशात पुढील चार आठवड्यापर्यंत म्हणजेच 6 जुलै पर्यंत कमी पावसाचा अंदाज स्कायमेटने वर्तविला आहे.  त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडण्याची शक्यता आहे.  पाऊस वेळेवर व पुरेसा न पडल्यास पेरणीला उशिर होऊ शकतो. मान्सूनला केरळमध्ये पोहोचण्यासाठी यावर्षी एक आठवडा उशिर झाला आहे. त्यातच आता बिपरजॉय चक्रिवादळामुळे मान्सूनची गती मंदावली आहे. महाराष्ट्रात रविवारी तळ कोकणात मान्सून दाखल झाला. मात्र बिपरजॉय वादळामुळे मान्सूनच्या पुढील वाटचालीमध्ये अडथळा निर्माण झाला आहे. बिपरजॉय चक्रिवादळामुळे मान्सूनची गती मंदावली असून, जसा जसा चक्रीवादळाचा प्रभाव कमी होईल तसा-तसा मान्सून राज्यभरात सक्रीय होईल असं भारतीय हवामान खात्यानं मंगळवारी म्हटलं होतं.