धरणगाव : तालुक्यातील शेतकऱ्यांना राशी सीडसचे 659 व महाकाॅट नामांकित बियाणे लागवडीसाठी मिळत नाहीय. त्यामुळे प्रशासनाने चौकशी करून शेतकऱ्यांना योग्य तो न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी शेतकरी सेना तालुका प्रमुख विनायक महाजन धरणगाव यांनी कृषी विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
काही ठिकाणी शेतकऱ्यांना दिशाभूल करत एकास एक असं बियाणे खरेदी कराल तर नामांकित कंपन्यांच्या बियाणे मिळेल, अशी भूमिका सांगितले जाते. त्यामधे शेतकऱ्यांना खुप मनस्ताप सहन करावा लागत आहे. पैसे देऊन राशी सीडसचे कापुस बियाणे मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
तरी प्रशासनाने त्वरित चौकशी करून शेतकऱ्यांना योग्य भावात मिळेल अशी व लवकरच बियाणे बाजारात उपलब्ध असलेल्या दुकानात जाऊन चौकशी करून शेतकऱ्यांना योग्य तो न्याय मिळवून द्यावा अशी मागणी शेतकरी सेना तालुका प्रमुख विनायक महाजन धरणगाव यांनी केली. याबाबत तालुका कृषी अधिकारी तसेच तहसील कार्यालय धरणगाव व जिल्हा अधिकारी जळगाव कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.