शेतकऱ्यांवरील संकट जाईना! जळगावला पुढचे काही दिवस महत्वाचे, वाचा हवामान खात्याचा ‘हा’ अंदाज..

जळगाव : राज्यात ऐन उन्हाळ्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकर्‍यांचं अतोनात नुकसान झालं आहे. अशात आता मे महिनादेखील अवकाळी पावसाचा असेल असा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. पुढील 5 दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांना गारपीटीसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यात जळगाव देखील पुढचे काही दिवस महत्वाचे राहणार आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज विदर्भातही धुवांधार पाऊस होण्याची शक्यता आहे. विदर्भासह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. अधिक माहितीनुसार, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पुढचे २ दिवस तर विदर्भामध्ये पुढचे ३ दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे सध्या कमाल तापमानात घट झाली असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

जळगावला पुढचे काही दिवस महत्वाचे?
दरम्यान, जळगावला पुढचे काही दिवस जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जळगावला आज (मंगळवारी) मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.