Farmer : PM किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. किसान सन्मान योजनेचा १४ वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २७ फेब्रुवारी रोजी PM किसानचा १३ वा हप्ता जारी केला होता. याचा लाभ देशभरातील जवळपास ८ कोटी शेतकऱ्यांना मिळाला होता.
PM किसानचा १४ वा हप्ता कधी मिळणार?
PM किसान सन्मान योजनेचा १४ वा हप्ता येत्या जून महिन्यात पात्र शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर जमा केला जाणार आहे. मात्र या योजनेचा लाभ मिळण्यासाठी पात्र शेतकऱ्यांचे बँक खाते हे आधार क्रमांकाशी जोडणे अनिवार्य आहे. बँक खात्याला आधार क्रमांक जोडलेला नसल्यास, हे पैसे जमा होणार नसल्याचे राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी सांगितलं आहे.
PM किसानचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी काय करावे?
आपापल्या गावात टपाल विभागाच्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत (आयपीपीबी) खाते उघडावे.
यासाठी आधार कार्ड आणि स्वतःचा मोबाईल क्रमांक टपाल कार्यालयात जावे.
टपाल कार्यालयातील कर्मचारी हे आपले बँक खाते आपल्या आधार क्रमांकाशी जोडतील.