मुंबई : राज्यातील लाखो शेतकऱ्यांना एक रुपयात पंतप्रधान पीक विमा योजना लागू झाली आहे. त्यामुळे आपत्तीच्या वेळी लाखो शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा होता. मात्र काही दिवसापासून शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी होताना अडचणी येत होत्या.
काही तांत्रिक अडचणींमुळे पीक पीक विमा भरता येत नव्हता. तर प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने शेवटची तारीख 31 जुलै पर्यंत होती. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची चिंता वाढली होती.
त्यानंतर राज्यसरकारने केंद्र सरकारकडे पीक विमा संदर्भात मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने पीक विमा भरण्यास आता मुदतवाढ मिळाली आहे. याची माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विटद्वारे दिली असून आता ३ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात पीक विमा भरता येणार आहे.