धुळे : शेतातील पिकांची लागवड करत त्या आडून गांजाची केलेली शेती पोलिसांनी उध्वस्त केली आहे. शिरपूर तालुक्यात हा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील लाकड्या हनुमान परिसरात गांजाची लागवड झाल्याची खात्रीलायक माहिती सांगली पोलिसांना मिळाली होती. या संदर्भातील माहिती मिळताच सांगवी पोलिसांनी तात्काळ संबंधित ठिकाणी छापा टाकला असता त्या ठिकाणी सदर शेतात कापूस व तुर या पिकाच्या आडून गांज्याची शेती केली असल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी सर्व गांज्याची शेती उध्वस्त केली असून पुढील तपास सांगवी पोलीस करीत आहेत.
शिरपूर तालुक्यातील लाकड्या हनुमान परिसरात सर्रासपणे सुरू असलेली गांज्याची शेती सांगवी पोलिसांनी उध्वस्त केली आहे. कापूस व तूर पिकाच्या अडून ही शेती संबंधित ईसमाने केली असल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांची चाहूल लागताच संबंधिताने शेतातून पळ काढला आहे.