---Advertisement---

शेतात चारा कापत होते, अचानक काहीतरी चावल्या सारखं झालं; घटनेनं हळहळ

---Advertisement---

जळगाव : शेताच्या बांधांवर बैलांसाठी चारा कापत असताना सर्पदंश झाल्याने एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. पाचोरा तालुक्यातील बाळद खुर्द येथे २४ रोजी ही घटना घडली. या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. महादू नारायण पाटील (५८) असे मयताचे नाव आहे.

पाचोरा तालुक्यातील बाळद खुर्द येथे महादू नारायण पाटील (५८) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. दरम्यान, २४ रोजी शेताच्या बांधांवर बैलांसाठी गवत कापत असताना अचानक विषारी सापाने दंश केला. काही तासांनंतर त्यांच्या दुर्दैवी मृत्यू झाला.

घरातील कर्ता पुरुष गेल्याने पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मजुरी करून ते आपल्या संसाराचा गाडा हाकत होते. सया घटनेनं  सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या परिवाराला शासनाने आर्थिक मदत करावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment