जळगाव : शेतात ज्वारी कापण्याचे काम करताना रानडुकराने अचानक हल्ला केल्याने दोनजण गंभीर जखमी झाल्याची घटना पाथरी येथे २५ रोजी घडली. जखमींना तात्काळ जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
जळगाव तालुक्यातील पाथरी गावात अमर राजाराम बारेला (१९), दिनू मोलशा बारेला (२०) हे वास्तव्यास आहे. मजूरीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करतात. गुरूवार, २५ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास पाथरी शिवारातील शेतात ज्वारी कापण्याचे काम करताना त्यांच्यावर अचानक रानडूकराने हल्ला केला.
या हल्ल्यात अमर बारेला आणि दिनू बारेला हे गंबीर जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी वाहनाने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. गावातील पोलीस पाटील संजीव लंगरे सहकार्य केले. याप्रकरणी अद्याप पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही. वनविभागाचे वनरक्षक जितेंद्र चिंचोले यांनी जखमींशी चौकशी केली आहे.