शेळ्या चरायला गेलेल्या मुलांना सापडला बॉम्ब, बॉल म्हणून त्याच्याशी खेळू लागले; पुढे जे घडलं…

शेळ्या चरायला गेलेल्या मुलांना बॉम्ब सापडला. मुलांनी तो बॉल म्हणून उचलला आणि खेळायला सुरुवात केली, त्याचदरम्यान बॉम्बचा स्फोट झाला. यामध्ये पाच मुले जखमी झाली असून एक गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने घटनास्थळ गाठून सर्व जखमी मुलांना उपचारासाठी राणीगंज रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, गुन्हेगारांनी स्फोटक साहित्य लपवून ठेवले असावे, असाही अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.

अख्तारी प्रवीण, मोहम्मद अफजल, सोनू कुमार, साजिद नदाफ आणि जुल्फराज अशी जखमी मुलांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले. एफएसएल टीमलाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. बॉम्ब निकामी पथक आल्यावर दुसरा बॉम्ब निकामी करण्यात आला. एफएसएल पथक रात्री उशिरापर्यंत तपासात व्यस्त होते.

या घटनेबाबत स्थानिक नागरिकांनी सांगितले की, नेहमीप्रमाणे मुले म्हैस-बकर्‍या चरायला गेली होती आणि तेथे खेळत होती. यावेळी त्याला कालव्याच्या काठावर एक पांढरा बंडल आढळून आला, तो चेंडू समजून तो खेळू लागला. यावेळी बॉम्बचा स्फोट होऊन पाच मुले जखमी झाली. बिहारमधील अररिया येथे ही घटना घडलीय.

या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की, स्थानिक लोक म्हणत आहेत की लहान मुले बॉल असल्याचे समजून त्याच्याशी खेळत होती. ज्यानंतर त्याचा स्फोट झाला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.