शॉर्टकट जाण्यासाठी नदीत उतरला इसम, काळाने केला घात

रंजाणे ता.अमळनेर : शॉर्टकट जाण्यासाठी नदीत उतरलेल्या इसमाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रंजाणे येथे घडली. विश्वास मालचे (५५ ) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.

तालुक्यातील रंजाणे येथे शॉर्टकट जाण्यासाठी विश्वास मालचे (५५ ) हे लाडगावकडून बोरी नदीत उतरले. दरम्यान, त्यांचा पाण्यात तोल जाऊन बुडून मृत्यू झाल्याचे प्रत्यक्ष दर्शणींनी सांगितले.

स्थानिकांकडून बुधवारी संध्याकाळपर्यंत शोधमोहीम स्थानिकांकडून सुरू होती, मात्र तो इसम मिळून आला नव्हता.  आज सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू झाली असता, विश्वास मालचे यांचे शव मिळून आले आहे. अमळनेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले आहे.