शौचास गेलेल्या महिलेवर अत्याचार, दोन जणांवर गुन्हा दाखल

जळगाव : बदलापूर, सिन्नर तालुक्यामधील अत्याचाराच्या घटना ताज्या असतानाच अशीच घटना यावल तालुक्यात घडलीय. शौचालयाला गेलेल्या ३६ वर्षीय महिलेवर एकाने बळजबरीने अत्याचार करण्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रानुसार, यावल तालुक्यातील एका गावात ३६ वर्षीय आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. पिडीत महिला २३ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता गावाबाहेर शौचालयाला गेली. दरम्यान, गावातील विनोद दोधु मेढे याने पिडीत महिलेचा हात पकडून तिला शेतात ओढले. तसेच धमकी देत तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला.

शिवाय संशयिताने फोटो काढून नातेवाईकाला पाठविले. त्याने ते फोटो पुन्हा पिडीत महिलेच्या नातेवाईकांना पाठवून बदनामी केली. या प्रकाणानंतर पीडित महिलेने फैजपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार विनोद दोधु मेढे याच्यासह एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मैनुद्दिन सैय्यद करीत आहे.