श्रद्धा वालकरसारखं आणखी एक हत्याकांड; प्रियकराने केले तरुणीचे 31 तुकडे

प्रेमाची किंमत एका तरुणीला आपला जीव देऊन चुकवावी लागली. तिला इतका वेदनादायक मृत्यू देण्यात आला की त्याबद्दल ऐकूनच अंगावर काटा येईल. मुलीचा दोष एवढाच होता की, ती ज्या माणसावर प्रेम करत होती, ज्याच्यासोबत तिला आयुष्य घालवायचं होतं, तो आधीच विवाहित होता. असं असतानाही या तरुणाने तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, परिणामी मुलीला आपला जीव गमवावा लागला.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणीचे वय अवघे २२ वर्षे आहे. तरुणीच्या वडिलांनी सांगितले की, त्यांची मुलगी बुधवारी घरातून निघून गेली होती. बराच वेळ ती घरी न परतल्याने घरच्यांना तिची काळजी वाटू लागली. त्यानंतर गावकऱ्यांसह कुटुंबीयांनी आजूबाजूच्या परिसरात तिचा शोध सुरू केला. सर्वत्र शोध घेऊनही तिचा पत्ता लागला नाही, त्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसात मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली.

दरम्यान, कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला असता जंगलातून या तरुणीचा मृतदेह सापडला. तरुणीचा मृत्यू किती वेदनादायी होता, याचा अंदाज तिच्या शरीराचे लहान-लहान तुकडे करण्यात आले, यावरूनच लावता येईल. मृतदेहाचे तब्बल ३१ तुकडे करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ते जमिनीखाली पुरण्यात आले होते. पोलीस तपासादरम्यान मृतदेहाचे तुकडे सापडले.

याप्रकरणी पोलिसांनी तरुणीचे प्रेमसंबंध असलेल्या व्यक्तीला अटक केली आहे. त्याच्यासोबत त्याच्या पत्नीलाही अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीला पाच मुलेही असल्याचे सांगण्यात येत आहे. पती-पत्नीने खून केल्याचा संशय पोलिसांना आहे.

दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी तरुणी तिच्या प्रियकराच्या घरी गेली होती आणि त्याच्यावर लग्न करण्यासाठी दबाव टाकत होती. त्यानंतर प्रियकराने पत्नीसह तरुणीची हत्या केली. पोलिसांनी मुलीचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत, तर अटक आरोपींची चौकशी करून हत्येचे गूढ उकलण्यात पोलीस कामाला लागले आहेत.

या घटनेने तरुणीच्या कुटुंबात खळबळ उडाली. हे प्रकरण ओडिशातील नबरंगपूर जिल्ह्यातील आहे. दुसरीकडे, या घटनेने पुन्हा एकदा श्रद्धा हत्याकांडाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. ज्यामध्ये श्रद्धाच्या प्रियकराने तिची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे केले.