---Advertisement---

श्रीरामाबद्दल वादग्रस्त विधान करणे भोवले; आव्हाडांवर गुन्हा दाखल

---Advertisement---

पुणे : श्रीरामाबद्दल वादग्रस्त विधान करुन धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे. भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी याप्रकरणी तक्रार दिली होती. पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आव्हाडांविरोधात भाजपनं आव्हाड यांच्याविरोधात काल आंदोलन केलं होतं. यावेळी धीरज घाटे यांनी विश्रामबाग पोलिसांकडं आव्हाडांविरोधात तक्रार दिली होती. यावरुन कलम २९५ अंतर्गत आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment