– डॉ. प्रज्ञा प्रकाश पुसदकर
Samarth Ramdas Swami पर्यावरणाच्या आजच्या दुरवस्थेला आपण सर्वच जण जबाबदार आहोत. आपला निसर्गावरील भार अतिरेकी प्रमाणात वाढलेला आहे. त्यामुळे निसर्गाचे शोषण, प्रदूषण नित्य वाढत आहे. हे असेच सुरू राहिले तर विकासाच्या धुंदीत आपण एक दिवस विनाशाच्या कड्यावरून खाली कोसळणार आहोत असे वाटते. Samarth Ramdas Swami संतांनी निसर्गातील पर्यावरणाचे महत्त्व ओळखले होते. आपल्या ओव्या, अभंग अशा रचनांमधून त्यांनी पर्यावरणविषयक विचार मांडलेले आहेत. संत तुकाराम महाराज आणि श्री समर्थ रामदास स्वामी समकालीन संत होते.
तुकाराम महाराज म्हणतात, ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे!’ श्री समर्थ रामदास स्वामी म्हणजे एक सुविचार व एक स्फुल्लिंग होते. त्यांनी ग्रंथराज ‘दासबोध’ नयनरम्य धबधब्यांनी सुशोभित कडेकपारी असलेल्या शिवथर घळीत लिहिला. Samarth Ramdas Swami अनेक झाडे, कंदमुळे, गवत-तृणे औषधियुक्त आणि गुणकारी आहे. निसर्गावर समर्थांचे भारी प्रेम. माणसाच्या मेंदूचा विकास होऊन माणसाने प्रगती साधली. भौतिकदृष्ट्या समृद्धी करीत असताना निसर्गाची हानी होते आहे, या मुद्याकडे त्याचे लक्ष नव्हते. समर्थ म्हणतात, नानावल्ली मध्ये जीवन नाना फळी फुली जीवन नाना कंदी मुळी जीवन गुणकारके माणसाच्या अज्ञानामुळे किंवा त्याचे महत्त्व न कळल्याने जंगल संपत्तीचा विध्वंस होतो आहे. या जंगलतोडीविषयी जरा अतिशयोक्तीने पण महत्त्व सांगण्यासाठी मुद्दाम श्री समर्थ म्हणतात…Samarth Ramdas Swami
शतावरुषे मेघ जाती। तेथे प्राणी मृत्यू पावती…असंभाव्य तडके। क्षीती मर्यादे वेगळी
सूर्य तो बारा कळीतेजे। पृथ्वीची होय होळी…अग्नी पावता पातळी। शेष विषमी सूर्यास खडतरता
चढे हलकल्लोळ चहुकडे। कोसळती मेरूचे कडे घडाघडायमान।। निसर्गाची हानी होत असलेल्या काळात मानवाचे सगे सोयरे यांच्या डोळ्यात त्यांनी अंजन घातले आहे. मानवाची सगळी सोयरी खरे तर ही झाडे वा-यावर डोलणारी शाळूची पिके आणि पांढराशुभ्र कपाशीचे हिरव्या बोंडातून ऊतू जाणारे चैतन्य, अनंत प्रकारची फुले त्यावरील शेकडो रंगाची स्वप्ने, शाळू टिपायला आलेली विविध रंगी पाखरे असा शिवाराचा थाट तो काय वर्णावा आणि अशी पिकं सोयरी वाटतात, असे ते म्हणतात.
पण मानवच तो त्याची अधिक उपभोगाची इच्छा तीव्र होते. मग अशी सुफलाम भूमी उजाड बनते. पर्जन्यहीन पाऊस पडून जातो. अशामुळे निसर्गाची हानी होते. तेव्हा काही जाणत्या लोकांनी माणसांच्या निसर्गाविरुद्धच्या वागणुकीवर निर्बंध घालण्यासाठी काही नियम केले; त्यालाच धर्म असे म्हणतात. धर्म म्हणजे जो धारणा करतो. जो सर्वकाही सुस्थिती ठेवतो तो धर्म. रानेच्या राने मनुष्याच्या हव्यासापोटी भक्ष्यस्थानी पडतात. Samarth Ramdas Swami तेव्हा जलाशयाच्या साठा संपून सूर्याची प्रखरता वाढते आणि मग एकच हलकल्लोळ होतो; म्हणूनच पशुपक्ष्यांची, झाडांची हिंसा, तोड, शोषण करणे आणि निसर्गाची हानी करणा-यांनी पाप केले असे समजले जाते. निसर्गाचे संवर्धन पोषण हे नक्कीच पुण्य आहे. शिवाजी महाराजांना या निसर्गदत्त जंगल संपत्तीची, वृक्ष ठेव्याची काळजी होती. आधुनिकीकरणाच्या कोणत्याही प्रक्रियेत सापडून हानी पोहोचू नये म्हणून वृक्षसंपत्तीचे मोठेपण जाणून घेत वृक्षतोड न करण्याचे आज्ञापत्र त्यांनी काढले.
समुद्राच्या पाण्याचे बाष्पीभवन होणे आणि पुढे यातूनच मेघ तयार होऊन पर्जन्याचा वर्षाव होणे ही निसर्गातील महत्त्वाची क्रिया आहे. मेघ तयार होणे आणि पर्जन्य बरसणे ही प्रक्रिया समर्थांनी प्रभावीपणे मांडली आहे. Samarth Ramdas Swami समर्थ म्हणतात,
वायो मेघाचें भरण भरी। सवेंच पिटून परतें सारी । गिरी हून दाट फौजा मेघ उठले। लोका काजा गरजेगर्जो तडक विजावायोबळे।
वायू मेघात वाफ भरून तयार करतो आणि लगेच त्याला धक्के देऊन दूर करतो. लोकांच्या कार्यासाठी पर्वताच्या शिखरावरून मेघांच्या फौजा बाहेर पडतात व विजांचा कडकडाट होतो. ‘वायो सुटे सरारा असंभाव्य पडती गारा’ असे वर्णन करून समर्थ म्हणतात, ढग अडविण्यासाठी पर्वताच्या रांगा हव्यात. डोंगर माथ्यावरून हे ढग येऊ लागतात. भूमीवर सोसाट्याचा वारा सुटतो आणि मग पर्जन्यवृष्टी होते. पाण्याचे नियोजन पुनर्वापर आणि भूगर्भात पाण्याची साठवण करण्यासाठी समर्थ रामदासांनी पर्वतांना खूपच महत्त्व दिलेले आहे. Samarth Ramdas Swami समर्थ वर्णन करताना म्हणतात, नद्या पर्वतीहून कोसळल्या…नाना सांकडीमध्ये रिचवल्या … धबांबा खळाखळा चालील्या … असंभाव्य गायमुखे पाट जाती … नाना कालवे वाहती … नाना झ-या झिरपती झरती … नीर डुरे विहिरे पाझर… पर्वत फुटोनी वाहे नीर… जितकी मोठी पर्वतरांग जितकी मोठी डोंगर वस्ती तितकेच पर्जन्याचे प्रमाण मोठे असे समजावे.
Samarth Ramdas Swami प्रत्येक डोंगरावरून पाण्याचे प्रवाह प्रचंड उसळ्या मारीत असंख्य झरे, नद्या, मोहोळ, भरत धावतच येतात. त्यातूनच पुढे पाण्याची समृद्धी होते. समर्थ म्हणतात, ठाई ठाई डोहो तुंबती विशाळ तळी डबाविती डबाविती भबाविती कालवे पाट मेघोदक अंतराळी वृष्टी करी निसर्ग भरभरून देत असतो; मग माणसाने पाण्याचे नियोजन आणि पुनर्वापर करणे आवश्यक आहे. आज विकासाच्या नावाखाली अनैतिक जंगल तोडीने ओझोन थराला खिंडार पडलेले आहेत. त्याने भावी पिढ्या कर्करोगाने ग्रस्त होण्याची भीती आहे. याचाच अर्थ बाहेर निसर्ग संपतोय आणि आतून माणूस संपत आहे. किती भयावह स्थिती आहे, पण निसर्ग काही माणसांना ठार मारण्यासाठी किंवा प्रजाती नष्ट करण्यासाठी टपून बसलेला नाही. Samarth Ramdas Swami माणसाने ख-याखु-या विकासाचा दुसरा मार्ग पर्याय निवडावा; जितकी आतापर्यंत जंगलतोड झाली आहे तितकी झाडे लावून त्याची निगराणी करून भावी पिढी सुरक्षित करू या. निसर्गाशी समझोता करून विकास करण्यात माणसाचे भले आहे, हे समजून घेतले पाहिजे.
९४२३७३३६३०