मुंबई : श्री रामलल्ला प्राण- प्रतिष्ठा दिनानिमित्त राज्य सरकारने सोमवार, दि.२२ जानेवारी २०२४ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. याबाबतची अधिसूचना सामान्य प्रशासन विभागाने निर्गमित केली आहे.
अयोध्येत 22 जानेवारी 2024 अयोध्येत श्रीराम जन्मभूमी येथे उभारण्यात आलेल्या भव्य मंदिरात श्रीराममललांची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारद्वारे 22 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
22 जानेवारी रोजी सरकारी, खासगी कार्यालय, शाळा आणि महाविद्यालयं बंद राहणार आहेत दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांना हाफ डे देण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर राज्य सरकारकडून सुट्टी जाहीर करण्यात आलीये.