Maharashtra Politics : संजय राऊतांची पुन्हा तुरुंगात जाण्याची वेळ झाली आहे. पत्राचाळीतल्या मराठी माणसांचे शाप राऊतांना लागणार. नैतिकतेची भाषा राऊतांनी करु नये, असा इशारा आमदार नितेश राणेंनी राऊतांना दिला आहे. संत्तासंघर्षावरील निकालावर राऊतांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर नितेश राणेंनी पत्रकार परिषद घेऊन राऊतांचा खरपुस समाचार घेतला. शिवाय, नैतिकतेच्या आधारे ठाकरेंनी सत्ता सोडली. असं राऊत म्हणाले होते. यावर नैतिकतेच्या गोष्टी तुम्ही काय करता? असा प्रतिसवाल राणेंनी उपस्थित केला.
नितेश राणे म्हणाले, “संजय राऊत आणि अनिल देसाईंमुळे उध्दव ठाकरे संपले. अनिल देसाई काल कुठे होते? राऊतांनी आरे गेस्ट हाऊसमध्ये काय झालं हे सांगाव? राऊतांना अक्कलदाढ अजून आलेली नाही. संजय राऊत फार घाबरलेला माणूस आहे. हातभर फाटल्यावर चेहरा कसा होतो तसा कालपासून झाला आहे. सरकार अजून भक्कम झालं आहे.अब तेरा क्या होगा संजय राऊत?जेलमध्ये जाण्याचे दिवस पुन्हा येणार. जेलमध्ये असताना बाथरूम साठी अन्य कैद्यांबरोबर भांडायचा.इतर कैद्यांनी जेलरकडे याची तक्रार केली होती. पत्राचाळ मधल्या मराठी माणसाचा शाप तुला लागणार.बॅग भरून ठेव.”
नैतिकतेच्या कारणामुळे मी राजीनामा दिला. असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. यावर प्रत्युत्तर देताना राणे म्हणाले, “उद्धव ठाकरे ,संजय राऊत नैतिकतेची भाषा करतायत, मला त्यांना विचारायचं आहे,शिवसेना अधिकृत ही शिंदे साहेबांकडे आहे.उबाठा हे नाव त्यांना तात्पुरत दिलं होतं.त्यांना वेगळं नाव आणि चिन्ह निवडावंच लागेल. राजीनामा दिला तेव्हा फेसबुक लाईव्ह केलं त्याची उद्धव ठाकरेंना आठवण करून देईन, मुख्यमंत्री आणि आमदारकीचा राजीनामा देतो अस म्हणाला होतात.मग अजून आमदारकीचा राजीनामा का दिलेला नाही?तुमच्यात खरच नैतिकता असेल तर देऊन टाका आमदारकीचा राजीनामा. २०१४ ते १९ चा काळ आठवा. उद्धव ठाकरे सख्ख्या भावाची तुम्ही काय अवस्था करून ठेवली आहे ते कोर्टात जाऊन बघा. महाराष्ट्राला सर्वात बेईमान माणूस कोण असेल तर तो उद्धव ठाकरे.आणि नैतिकतेची भाषा तुम्ही करता.”
नितीशकुमार यांनी ठाकरेंची भेट घेतली. यावर राणे म्हणाले, “काल नितीशकुमारजीन बरोबर लालूंचा मुलगा आलेला होता. ज्या लालूंनी संधी मिळेल तिथे बाळासाहेबांचा अपमान केला होता.हिंदुत्वाचा अपमान केला.तुमच्यात हिंमत असती तर नितीशकुमार आणि लालूंच्या मुलाला बाळासाहेबांच्या खोलीत घेऊन जायला हवं होतं,नतमस्तक व्हायला लावायला हवं होतं. संजय राजाराम राऊत.ज्या शिवसेनेच्या आमदारांच्या मतावर खासदार झालास त्याचा पहिला राजीनामा दे.बघू तुझी नैतिकता. रोज लोक तुझ्यावर थूकुन जाता आहेत.रोज महाविकास आघाडीचे लोक टीका करता आहेत. तू पत्रकार आहेस का हे पाहिलं तपासलं पाहिजे.कुठल्या पत्रकाराकडे एवढी प्रॉपर्टी असते?तू पत्रकार आहेस की दलाल हे सांग पहिला. जो बाळासाहेबांचा झाला नाही, तेव्हा बाळासाहेबांनी खासदारकी दिली नाही म्हणून 6 जून 1998 ला लोकप्रभा त हा बाळासाहेबांवर लेख लिहिला होता. 8 कोटी रुपयांचा व्यवहार झाला असा संजय राऊत आरोप करतोय.या बाप लेकांचे कपडे उतरून रस्त्यावर आणेन. असा संजय राऊत लिहितोय.” असा हल्लाबोल राणेंनी केला.