ड्रग्ज माफिया ललित पाटिल चे नाशिक कनेक्शन समोर आल्यानंतर ठाकरे गट आक्रमक झाला आहे. नाशिकमध्ये ठाकरे गटाकडुन खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वात विराट मोर्चा काढण्यात येत आहे. यावर शिंदे गटाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी राऊतांवर हल्लाबोल केला आहे. राऊतांची नार्को टेस्ट करा, त्यांना वेड्याच्या इस्पितळात भरती करा. अशी मागणी फरांदेंनी केली आहे.
देवयानी फरांदे म्हणाल्या, “संजय राऊत मनोरुग्ण झाले आहेत. सकाळी उठून तेच ड्रग्स घेतात की अशी शंका आता महाराष्ट्रातील जनतेला येत आहे. रोज सकाळी उठून बेछूट आरोप करायचे. संजय राऊत यांचे सगळे आरोप नाशिकमधील ड्रग्सचा कारखाना उघडकीस आल्यानंतरचे आहेत. ललित पाटील हा शिवसेनेचा कार्यकर्ता होता. त्याचे फोटो देखील समोर आले आहेत.”
“राज्यात महाविकास आघाडीचं सरकार होतं, तेव्हा किती ड्रग्स तस्करांवर कारवाई झाली?ललित पाटीलकडून मातोश्रीवर किंवा संजय राऊतांन हप्ते जात होते का? याची चौकशी गृहखात्याने करावी. ललित पाटील पकडला गेल्याने संजय राऊत यांचे नुकसान झालं म्हणून त्यांची तडफड झाली आहे. संजय राऊत यांची नार्को टेस्ट करा.” असं फरांदे म्हणाल्या आहेत.