मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळं नेहमी चर्चेत असतात. त्यांच्या काही वक्तव्यांमुळे ते अनेकवेळा ट्रोल देखील होतात. ट्रोल झाल्यावर त्यावर खुलासा करतांना मांडलेल्या भुमिकेमुळे त्यांना पुन्हा ट्रोल केले जाते. आता पुन्हा एकदा ते ट्रोलर्सच्या निशाण्यावर आले आहे. यावेळी निमित्त ठरलेयं त्यांचं एक विधान, त्यामुळे संजय राऊत यांचं भुगोल कच्चे अशी चर्चा रंगली आहे.
संजय राऊत नेहमीसारखे आज सकाळी राज्यातील घडामोडींसंदर्भात माध्यमांशी संवाद साधण्यासाठी आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रति उत्तर देताना ते असं काही बोलून गेले ज्यामुळे त्यांच्याच अडचणी वाढल्या. ते म्हणाले की, या देशात ३६ राज्य आहेत. ३६ मधल्या १६ चा आकडा काय घेऊन सांगताय? किती नावं घेऊ मी? यांचं डोकं ठिकाणावर आहे का? तुमच्याकडे काय आहे? एक गुजरात आणि उत्तर प्रदेश आहे. बाकी काय आहे तुमच्याकडे? तुमच्या राष्ट्रीय अध्यक्षांचं राज्य हिमाचल प्रदेशही तुम्ही जिंकू शकला नाहीत, अशीही टीका संजय राऊत यांनी फडणवीसांवर केली.
दरम्यान, संजय राऊत यांचं भुगोल कच्चे अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. कारण देशात २८ राज्य आहेत. ‘राऊतजी देशात ३६ नव्हे तर २८ राज्य आहेत.’ असं म्हणत राऊत यांना चांगलंच ट्रोल करण्यात येत आहे.