“संजय राऊत म्हणजे…” नार्वेकरांचं सुचक वक्तव्य

घटनाबाह्य काय झालंय हे कळायला तर हवं, संजय राऊत म्हणजे सुप्रीम कोर्ट नाही. असं सुचक वक्तव्य विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केलं आहे. खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना राहूल नार्वेकरांवर टीकास्त्र सोडलं होतं. चोर, लफंग्यांना घटनात्मक पदावर बसलेली व्यक्ती संरक्षण देत आहे. नार्वेकरांचं नाव काळ्याकुट्ट इतिहासात नोंदवलं जाईल. त्यांना राज्याची जनता माफ करणार नाही. असं राऊत म्हणाले होते. यावर आता नार्वेकरांनी प्रत्त्युत्तर दिलं आहे.
राहुल नार्वेकर म्हणाले, “विधीमंडळाच्या सार्वभौमत्वाशी मी कोणत्याही प्रकारे तडजोड होऊ देणार नाही. घटनाबाह्य काय झालंय हे कळायला तर हवं, त्याशिवाय न्यायालयाची कारवाई कशी होणार? संजय राऊतांचे आरोप बिनबुडाचे आहेत. हे निर्णयप्रक्रियेवर प्रभाव टाकण्यासाठी होत असते. त्यांना स्वस्त प्रसिद्धी प्राप्त करण्याची सवय आहे. अशा प्रवृत्तीला उत्तर न देणे, प्रोत्साहन न देणे हा उत्तम उपाय आहे. आमचा युक्तीवाद सर्वोच्च न्यायालयात केला जाईल.” असं नार्वेकर म्हणाले.