किमान आधारभूत किमतीसह डझनभराहून अधिक मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी दिल्ली मोर्चाची तयारी सुरू केली आहे. रविवारी शेतकरी आणि सरकार यांच्यात चौथ्या फेरीची बैठक झाली, त्यात सरकारने शेतकऱ्यांसाठी पाच वर्षांचा प्रस्ताव मांडला, मात्र हा विषय मार्गी लागला नाही. त्यानंतर आता शेतकऱ्यांनी दिल्ली मोर्चाची तयारी सुरू केली आहे.
जेसीबी मशिनबरोबरच मोठमोठी पोकलेन मशिनही शंभू हद्दीत पोलिसांचे बॅरिकेड्स तोडण्यासाठी पोहोचल्या आहेत. पोलिसांच्या अश्रूधुराच्या गोळ्या आणि रबर बुलेटपासून ऑपरेटर्सचे संरक्षण करण्यासाठी या मशीन्समध्येही बदल करण्यात आले आहेत. संपूर्ण केबिन लोखंडी जाड पत्र्यांनी फुलप्रूफ करण्यात आली आहे.
#WATCH | Protesting farmers bring heavy machinery including hydraulic cranes and earth movers to Shambhu on the Punjab-Haryana border pic.twitter.com/brTIhOSgXE
— ANI (@ANI) February 20, 2024