---Advertisement---

संतापजनक ! बदलापूरमध्ये जे घडलं, तेच नंदुरबारात घडणार होतं ? पण…

---Advertisement---

नंदुरबार : बदलापूर, सिन्नर तालुक्यामधील अत्याचाराच्या घटनांचा राज्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या घटनांमुळे शाळकरी मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. अशातच नंदुरबारमधील एका शाळेत असाच प्रकार विद्यार्थिनीच्या सजगतेमुळे होता होता वाचला. या प्रकरणी संशयिताविरोधात गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील एका शाळेत सफाई कर्मचाऱ्याने पाचवीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीला मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ दाखवला. तसेच त्याने विद्यार्थिनीला शाळा सुटल्यानंतर एकांतात भेटण्याचे सांगितले.

विद्यार्थिनीने तिच्या पालकांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर पालकांनी नंदुरबार शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. त्यानुसार संशयिताविरोधात गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. हा प्रकार शाळेचा सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला असून, शाळेकडून सफाई कर्मचाऱ्यावर कारवाई करून त्याला बडतर्फ करण्यात आले आहे.

नंदुरबार शहरातील शाळेत घडलेल्या या प्रकारामुळे पुन्हा एकदा शाळकरी मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी या संदर्भात योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. दरम्यान, पोलिसांनी तपास सुरु केला आहे, अशी माहिती नंदुरबार पोलीस अधीक्षक श्रावण दत्त एस यांनी दिली आहे.

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment