संपाची हाक; राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी व शिक्षक ‘या’ तारखेपासून बेमुदत संपावर

नंदुरबार : राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर संघटनांतर्फे कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी गुरुवार, 29 रोजी पासून बेमुदत संप पुकारण्यात येणार आहे. नंदुरबार जिल्हयातील कर्मचारी व शिक्षक शंभर टक्के संपात सहभागी होणार आहेत.

नवीन पेन्शन योजना रद्द करून सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करा, या प्रमुख मागणीसह रिक्त पद भरती 10,20,30 वर्षानंतरची आश्वासित लाभाची योजना, कंत्राटीकरण रद्द करून कायमस्वरूपी चतुर्थ श्रेणी कर्मचारी भरती या प्रलंबित प्रश्नांबाबत गुरुवार, 29 रोजी पासून बेमुदत संपाची हाक दिली आहे. याबाबतची नोटीस महाराष्ट्र राज्यचे मुख्यमंत्री यांना दिलेली आहे.

संघटनेच्या वतीने नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अमित मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकेतर संघटनेचे कार्यवाह रावसाहेब पाटील, कार्याध्यक्ष सतीश कुवर, सहसचिव जयेश वाणी, महिला उपाध्यक्ष प्रमिला महाजन, सेवक उपाध्यक्ष पाहूबा पाटील, उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी, उपाध्यक्ष मनीलाल पाटील, उपाध्यक्ष पवन मगरे, कोषाध्यक्ष योगेश निकम, अंतर्गत हिशोबनीस महेंद्र चकोर, प्रसिद्धीप्रमुख प्रशांत पवार, प्रयोगशाळा प्रतिनिधी जुबेर शेख, नंदुरबार तालुका अध्यक्ष सुरेश शिरसाठ, आशिष माळी, तळोदा उपाध्यक्ष हेमंत सूर्यवंशी, अक्कलकुवा उपाध्यक्ष मुकेश राणे, तालुका अध्यक्ष मनीलाल चव्हाण आदी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी नंदुरबार जिल्हा शाळेतील लेखनिक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बेमुदत संपात सहभागी होण्यासाठी आवाहन केले आहे.