“संविधानिकदृष्ट्या मराठा आरक्षण देता येत नाही. मराठा समाज हा मागास नाही. असे सुप्रीम कोर्टाने मान्य केलेले आहे. काल जे मराठा होते तेच आज कुणबी आहेत. कुठल्याही आयोगाने मराठा समाजाला मागास ठरवलेले नाही. त्यामुळे मराठा समाजाला मागास न ठरवता जीआर काढणे चुकीचे आहे.” अशी प्रतिक्रिया वकील गुणरत्न सदावर्ते यांनी दिली आहे.
गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षण विरोधात भाष्य केलं होतं. तसेच मनोज जरांगे यांच्या सभेवरही टीका केली होती. त्यानंतर आंदोलकांकडुन सदावर्ते यांच्या दोन कारची तोडफोड करण्यात आली होती.
गुणरत्न सदावर्ते म्हणाले, “कोणत्याही एका धोरणावर आपण समिती नेमतो, त्यावेळी आपण तटस्थ भूमिका ठेवली पाहिजे. विशिष्ट समाजासाठी काम करण्यासाठी विशिष्ट समाजाचे न्यायाधीश नेमू लागलो, तर या प्रकारची परंपरा चांगली नाही.
मला कोणत्याही निवृत्त न्यायाधीशांच्या समाजावर बोलायचे नाही, पण अशी परंपरा चांगली नाही. या समितीत विद्वान असतील तर त्यांना घ्या. पण विशिष्ट समाजाचे असतील तर अशा प्रकारचं काम देऊ नये.” असं सदावर्ते म्हणाले.