संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरू होणार !

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन बुधवार, ३१ जानेवारीपासून सुरू होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सकाळी ११ वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील. दोन्ही सभागृहांची ही संयुक्त बैठक नवीन संसद भवनातील लोकसभेच्या कक्षेत होणार आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू बुधवारी सकाळी १०.५५ वाजता संसद भवनात पोहोचतील. राष्ट्रपतींचे स्वागत करून, राज्यसभेचे अध्यक्ष, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेचे अध्यक्ष आणि संसदीय कामकाज मंत्री त्यांना सकाळी ११ वाजता संसद भवनातील लोकसभेच्या दालनात पोहोचतील. येथे राष्ट्रपती दोन्ही सभागृहातील सदस्यांना संबोधित करतील.