---Advertisement---

सकाळची वेळ, तरुण अचानक पडला विहिरीत, मृतदेह बघताच कुटुंबीयांनी…

---Advertisement---

धुळे : सोनगीर रोडवर असलेल्या विहिरीत पडून २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी कापडणे येथे घडली. भावेश निंबा पाटील असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत सोनगीर पोलिसांत मृत्यूची नोंद करण्यात आलेली नव्हती.

भावेश हा इंदिरानगर भागात आईवडील व भावासह राहत होता. त्याने बारावीचे शिक्षण पूर्ण केले होते. सध्या तो पोलिस व सैन्य दलात भरतीची तयारी करीत होता. तो सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास विहिरीत पडला. हा प्रकार काही महिलांच्या लक्षात आला. तब्बल चार तासांनंतर त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेह बघताच परिवारातील सदस्यांनी हंबरडा फोडला.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment