तरुण भारत लाईव्ह । १२ ऑक्टोबर २०२३। दिवाळीपर्यंत सोने – चांदीचे भाव कमी होणार असल्याचा अंदाज वर्तविला जात असताना हमास व इस्त्रायल यांच्यात भडकलेल्या युध्दामुळे स्वस्ताईचे स्वप्न भंगले आहे. सोने चांदीच्या दरात दररोज वाढ होताना दिसून येत आहे. ११ ऑक्टोबर रोजी चांदीच्या भावात ४०० रुपयांची वाढ होऊन चांदी पुन्हा ७० हजार प्रति किलो झाली.
पितृपक्ष सुरु झाल्यानंतर सोने चांदीचे भाव कमी होऊ लागले त्यात आंतराष्ट्रीय स्तरावरील स्थिती पाहता हे भाव दिवाळीपर्यंत आणखीन कमी होण्याचा अंदाज वर्तविला जात होता. असे असताना हमास व इस्त्राईल यांच्यातील युद्ध भडकले व त्याचा मोठा परिणाम जगभर दिसून आला. त्यामुळे गेल्या आठवड्यात कमी होत जाणारे भाव आता कमी होऊ लागले आहेत.
हमास व इस्त्राईल यांच्या युद्धामुळे हे भाव पुन्हा वाढू लागले आहेत. सोन्याचे भाव हि ५८ हजार ८०० प्रति तोळा इतके झाल्याने सोनेही आता ५९ हजारांच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत. तसेच दिवाळी पर्यंत सोने ६० हजाराच्या पुढे जाऊ शकते.