सणासुदीत सोने विक्रमी पातळीवर; जळगावात एक तोळ्यासाठी मोजावे लागतंय ‘इतके’ रुपये?

जळगाव । इराण-इस्त्रायल युद्धामुळे अनेक गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने आणि चांदीकडे मोर्चा वळवला आहे. परिणामी सोने चांदीचे दर महागले आहे. एकीकडे भारतात सणासुदीचे दिवस सुरु असताना दोन्ही धातूंमध्ये वाढ झाल्याने खरेदी करणाऱ्या ग्राहाकांचे डोळे पांढरे पडले आहे. जळगावच्या सराफा बाजारात अशा वधारल्या किंमती…

जागतिक घडामोडीमुळे सप्टेंबर महिन्यानंतर ऑक्टोबरमध्ये पण सोन्यासह चांदी दरवाढीचा धबाडका लावला आहे. जळगावात सोन्याचा दर विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात ३०० रुपयांनी वधारले. यामुळे विनाजीएसटी सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव ७६,८०० रुपयावर पोहोचला आहे. तर जीएसटीसह सोन्याचे प्रति तोला ७९ हजार रुपयांवर दर पोहचले. सध्या सोने दरात सुरु असलेली दरवाढ पाहून सोने ८० हजार रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता वर्तविला जात आहे. सोन्याचा भाव जर ८०,००० रुपयांच्या पुढे गेला तर यामुळे सर्वसामान्यांना मोठा धक्का बसू शकतो.

तसेच चांदी दरात देखील तेजी आली आहे. जळगावात चांदीच्या दरात २ हजार रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे विनाजीएसटी चांदीचा एक किलोचा दर ९३५०० रुपयावर पोहोचला आहे. तर जीएसटीसह चांदी प्रति किलो ९६,३०० रुपयांवर पोहोचली आहे. चांदीचे दर प्रति किलो एक लाखांपर्यंत पोहोचणार असल्याचा दावा सराफ व्यावसायिकांनी केला आहे.