मुंबई । शुक्रवारी म्हणजेच ११ ऑगस्ट रोजी बॉक्स ऑफिसवर ‘गदर 2’ आणि ‘OMG 2’ हे दोन मोठे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. या दोन्ही चित्रपटांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. मात्र यात २२ वर्षानंतर आलेल्या गदर 2 च्या सिक्वेलने पहिल्याच दिवशी रेकॉर्डतोड ओपनिंग केली आहे.
पहिल्याच दिवशी गदर 2 ने तुफान कमाई केली. ट्रेंड रिपोर्टनुसार ‘गदर २’ चित्रपटाने पहिल्या दिवशी ३५ ते ४० कोटी रूपयांपर्यंतचा गल्ला जमवला आहे.
‘गदर २’ ने सनी देओलला त्याच्या करिअर मधील सर्वात मोठी ओपनिंग दिली आहे. तर दुसरीकडे OMG 2 ने देखील पहिल्या दिवशी चांगली कामगिरी केली आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 9-11 कोटींचा गल्ला जमवला.
2001 च्या खऱ्या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा सिक्वेल घेऊन सनी देओल परत येत आहे कारण त्याच्याशी जोडलेल्या जुन्या आठवणी अनेक प्रेक्षकांना आकर्षित करेल. परंतु, त्याने केवळ अपेक्षाच ओलांडल्या नाहीत तर अनेक विक्रमही मोडले आहेत.गदर 2 पहिल्याच दिवशी ३५ ते ४० कोटीचा गल्ला जमविला. पहिल्या दिवसाच्या अंदाजानुसार हा चित्रपट आज शनिवार आणि उद्या रविवार मिळून १०० कोटी रूपयांची कमाई करेल, अशी शक्यता आहे. त्यामुळे सनी देओलचे बॉक्स ऑफिसवरचे हे रेकॉर्ड जास्त काळ पर्यंत स्मरणात राहणार आहे.