बॉलिवूड अभिनेता सनी देओल हा त्याच्या ‘गदर 2’ या चित्रपटामुळे चर्चेत होता. 2023 मध्ये बॉक्स ऑफिसवर सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत हा चित्रपट आहे. आता सध्या सनी हा त्याचा आगामी चित्रपट ‘सफर’ मुळे चांगलाच चर्चेत आला होता. त्याचं कारण म्हणजे मध्यांतरी त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता आणि या व्हिडीओत त्यानं मद्यपान केल्याचं दिसत होतं. मात्र, तो एक चित्रपटातील सीन होता हे अखेर स्पष्ट झालं होतं. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सनीनं खुलासा केला की तो एका गंभीर आजाराचा सामना करत होता. इतकंच नाही तर किती वर्ष तो या आजाराचा सामना करत होता याचा खुलासा केला आहे.
मुलाखतीत सनी देओलनं सांगितलं की त्याला डिस्लेक्सिया नावाचा आजार होता आणि त्यानं अनेक वर्ष त्याचा सामना केला आहे. जेव्हा तो शाळेत होता तेव्हा त्याला हा आजार झाला होता. त्यामुळे तो चित्रपटाच्या सेटवर देखील थोडा चिंतेत रहायचा.
डायलॉग बोलायला आणि त्याची डिलिव्हरी देताना त्याला त्रास व्हायचा. डिस्लेक्सिया आजारामुळे त्याला स्क्रिप्ट देखील वाचता येत नव्हती. त्यासोबत लिहायला देखील त्याला त्रास व्हायचा. या समस्येतून बाहेर पडण्यासाठी तो हिंदीमध्ये डायलॉग्स मागवायचा आणि अनेकदा वाक्य वाचायचा.