धुळे : महायुतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ प्रमोद नगर, नकाणे रोड वरील श्री महादेव मंदीरात जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले होते. धुळे भाजप महानगर अध्यक्ष गजेंद्र अंपळकर बोलत होते.
आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक, श्रमिक कारागिर, महिला वर्ग व युवकांना योग्य ते काम व अर्थ सहाय्य उपलब्ध करून देण्याचे काम नरेंद्र मोदी व त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने केल्यामुळे सबका साथ- सबका विकास साधला जात आहे.
यामुळेच यंदाच्या निवडणुकी अबकी बार ४०० पार हि घोषणा खऱ्या अर्थाने पूर्ण करण्याची जबाबदारी तुम्हाला आम्हावर असल्याने येत्या २० मे ला कमळाचे बटण दाबूण मा. श्री. बाबासाो भामरे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा असे आवाहन गजेंद्र अंपळकर यांनी केले.
या प्रसंगी यशवंत येवलेकर, सुनिल बैसाणे, प्रतीभा चौधरी, प्रथमेश गांधी, शाम पाटील, भगवान गवळी, नरेश आप्पा चौधरी, सुनिल कोठावदे, मंडल प्रमुख अरूण पवार, आदींसह नागरिक बंधु-भगीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.