जळगाव : जिल्हा समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद जळगाव या कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्ती योजनांनुसार विदयार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनांचा लाभ प्रदान करण्यात येत आहे. परंतु शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून केंद्र शासनाच्या निर्देशानुसार खालील मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजना ऑनलाईन पध्दतीने महाडिबीटी प्रणालीव्दारे राबविण्यात येणार असल्याचे कळविण्यात आलेले असून योजनांचा तपशिल खालीलप्रमाणे
इ. 9 वी ते 10 वी मध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विदयार्थ्यांना मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती, साफ सफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकाच्या पाल्यांना शिष्यवृत्ती, इ. 5 वी ते 7 वी मध्ये मधील अनुसूचित जातीच्या विदयार्थीनींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, इ. 8 वी ते 10 वी मधील अनुसूचित जातीच्या विदयार्थींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विदयार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती, महर्षि विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण शुल्क अनुसूचित जातीच्या विदयार्थ्यांना शिष्यवृत्ती तरी उपरोक्त प्रमाणे शिष्यवृत्ती योजना सन 2023 – 24 पासून ऑनलाईन पध्दतीने राबविणेकामी समाज कल्याण आयुक्तालयामार्फत आदेशित करण्यात आलेले आहे.
त्यानुसार जळगाव जिल्हयातील सर्व मुख्यध्यापकांनी सदर बाबतीस प्राधान्य देण्यात येवून माहे मार्च अखेर पावेतो कार्यवाही करणे अनिवार्य आहे. तसेच शाळेत प्रवेशित विदयार्थ्यांच्या पालकांनी देखील आपल्या पाल्याच्या शाळेशी संपर्क साधून पात्र योजनेचा लाभ घेणेकामी आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करण्यात येवून अर्ज भरणेकामी सहकार्य करणेबाबत मा. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा समाज कल्याण जिल्हा परिषद जळगाव यांनी कळविले आहे.