समुद्र किनाऱ्यावर कुठून वाहून आले हे रहस्यमय जहाज ? आश्चर्यचकित करेल ‘हा’ व्हिडिओ

न्यूफाउंडलँड, कॅनडातील स्थानिकांना आणि अधिकाऱ्यांना समुद्रकिनारी पडलेल्या शतकानुशतके जुन्या जहाजाचे अवशेष पाहून धक्काच बसला. अंदाजे 80 फूट लांबीचे हे जहाज 20 जानेवारीला पहिल्यांदाच दिसले. हे १९व्या शतकात बांधले गेले असावे असा अंदाज आहे. फियोना या शक्तिशाली वादळात जहाज फुटले असावे आणि ढिगारा किनाऱ्यावर वाहून गेला असावा, असेही मानले जात आहे. सध्या याची चौकशी सुरू आहे.