तरुण भारत लाईव्ह । २९ सप्टेंबर २०२३। अपघाताचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अशातच समृद्धी महामार्गावरून जात असताना एका कारचे टायर फुटले या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं आहे.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, चारचाकीतून व्यक्ती अमरावतीवरून संभाजीनगरकडे जात होते. यावेळी समृद्धी महामार्गावर कारचा मागील टायर फुटले आणि कार थेट डिव्हायडरला धडकली. या अपघाताची माहिती मिळाल्यावर तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतास बाहेर काढून जखमीना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं आहे. जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत. मात्र त्यांची प्रक्रूती गंभीरअसल्याने मृतांची संख्या आणखी वाढण्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे.
समृद्धी महामार्गावर आठ महिन्यांच्या कालावधीत काही लहान-मोठे असे ७२९ अपघात झालेत. यातील ४७ अपघातात व्यक्तींना आपला जीव गमवावा लागलाय. या ४७ अपघातात १०१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, इतर ९९ अपघातात २६२ जण गंभीर जखमी झाले आहेत. येथील अपघाताच्या घटना वाढत असल्याने येथून प्रवास करण्यासाठी नागरिकांच्या मनात भीती भरलीये.