समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, एक गंभीर

तरुण भारत लाईव्ह । २० सप्टेंबर २०२३। दिवसेंदिवस अपघाताच्या घटना वाढत चाललेल्या आहेत. अशातच समृद्दी महामार्गावर झालेल्या एका भीषण अपघाताची बातमी समोर येत आहे.  मंगळवारी संध्याकाळी गौरी गणपतीसाठी पुण्याहून अमरावतीला जात असताना कारचा वन्यप्राण्याला धडकून अपघात झाला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहे.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, दुरतकर कुटुंबीय गौरी गणपतीसाठी पुण्याहून अमरावतीला या मार्गाने प्रवास करत असतांना अचानक वन्यप्राणी लावलेले कठडे ओलांडून आले. अचानक समोर आलेल्या प्राण्यांमुळे  हा अपघात झाला.  हा अपघात इतका भीषण होता कि या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून इतर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

समृद्धी महामार्गावर अवघ्या आठ महिन्यांमध्ये काही लहान तर काही मोठे 729 अपघात झाले असून त्यापैकी 47 अपघात जीवघेणे ठरले आहेत. या 47 अपघातात 101 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, इतर 99 अपघातात 262 जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. राज्य पोलिसांच्या “महामार्ग सुरक्षा” दलाने समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातांचा खास अभ्यास केला असून त्या आधारावर तयार केलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.