तरुण भारत लाईव्ह । ५ ऑक्टोबर २०२३। दिवसेंदिवस अपघात वाढत चालले आहेत आणि अपघातात मृत्यू होणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. अशातच समृद्धी महामार्गावर अपघात झाल्याचे वृत्त समोर येत आहे. मिनी ट्रॅव्हल्स आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात एकाचा दुर्देवी मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, एक मिनी ट्रॅव्हल्स रस्त्याच्या कडेला उभी होती. त्यावेळी महामार्गावरून वेगाने येणाऱ्या ट्रकने बसला मागून जोरदार धडक दिली. प्रवीण राजकुमार छत्री याचा जागीच मुत्यू झाला असून ट्रक चालक मगबुल अली जखमी झाले आहे. दरम्यान ट्रॅव्हल्सचा टायर बदलण्याचं काम सुरु असताना हा अपघात झाला. सुदैवाने बसमधील सर्व प्रवासी खाली उतरले असल्याने मोठी दुर्घटना टळली.
जालना इंटरचेंज ते सावंगी मार्गातील टॉवरचे काम सुरू आहे. यामुळे १० ते १२ ऑक्टोबर आणि २५-२६ ऑक्टोबर दरम्यान दुपारी १२ ते ३.३० या वेळेत समृद्धी महामार्ग वाहतूकीसाठी बंद असल्याचे कळवण्यात आले आहे. समृद्धी महामार्गावर १० ते १२ ऑक्टोबर आणि २५-२६ ऑक्टोबर दरम्यान दुपारी १२ ते ३.३० या कालावधीत कोणतीही वाहतूक होणार नाही.अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे छत्रपती संभाजीनगर विभागाचे प्रकल्प संचालक रामदास खलसे यांनी दिली आहे.