तरुण भारत लाईव्ह । १२ ऑक्टोबर २०२३। संध्याकाळी भूक लागल्यावर वेगळं काहीतरी खावंसं वाटत पण काय वेगळं करावं हा प्रश्न पडतो. तर अशावेळी तुम्ही समोसा पिनव्हिल करू शकता. समोसा पिनव्हिल घरी करायला खूप सोप्प आहे. समोसा पिनव्हिल घरी कसे बनवले जाते हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
साहित्य
मैदा, कणीक, रवा, मीठ, तेल, पाणी, मटार, जिरे, हिरवी मिरची, धने पूड, लाल तिखट, गरम मसाला, आमचूर पावडर, कोथिंबीर
कृती
सर्वप्रथम, पीठ, रवा, मीठ आणि तेल एकत्र करुन घ्या. मऊ गोळा बनवण्यासाठी जेवढं पाणी लागेल तेवढं घाला. पिठाचा गोळा दमट सुती कापडानं झाकून ठेवा. यानंतर पाव कप पाण्यात तीन टेबलस्पून मैदा आणि कणीक घालून ते व्यवस्थित ढवळा आणि एका बाजूला ठेवून द्या. आता आवरणासाठी बनवलेला पिठाचा गोळा पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घ्या. आता याचे छोटे-छोटे गोळे बनवून घ्या.
एका लहान गोळ्याचे दोन भाग करा. त्या दोन्ही लहानशा गोळ्याच्या पोळ्या बनवून घ्या. एका पोळीवर सारण पसरवा आणि त्यावर दुसरी पोळी ठेवा. आता त्याचा रोल करा. थोडासा पाण्याचा हात लावून रोलच्या कडा बंद करा. सुरीने त्या रोलचे तुकडे करा. छोटे-छोटे तुकडे मध्यभागी दाबा. एका कढईत मध्यम आचेवर तेल गरम करुन घ्या. लहान-लहान तुकडे आधी बनवून ठेवलेल्या, पाणी आणि पिठाच्या मिश्रणात घोळवून मग तळून घ्या. पिनव्हीलला सोनेरी रंग येईपर्यंत तळा. तयार आहे समोसा पिनव्हिल.